‘गांधी’ : गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ आणि जगात सर्वांत जास्त बघितला गेलेला एक चित्रपट
आज माझा वर्तमान पुन्हा गांधी संदर्भ घेऊन उभा आहे. भारतीय स्वातंत्रलढ्याचे भाग म्हणून जनमानसातील गांधींची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आजच्या काळात खूप जोरकस राजकीय प्रोपगंडा राबवला जात आहे. आज माझा मुलगा अडीच वर्षांचा आहे. त्याला मी अजून २० वर्षांनी त्याच्या जाणत्या वयात विचारेल की, गांधीजी कोण होते? तर माझ्या मुलाला गांधीजी कसे माहिती असतील हाच मोठा प्रश्न आहे. त्याला दाखवायला माझ्याकडे अॅटनबरोचे ‘गांधी’ आहेत.......